राजकारण
महिला महोत्सवात राष्ट्रीय भारूडकार चंदाताई तिवाडी यांची लोककलाप्रारंभ कला अकॅडमीतर्फे आयलीफ बँक्वेट हॉलमध्ये ०८ नोव्हेंबरला भव्य आयोजनठाणे: सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात गेली २३ वर्ष कार्यरत असलेल्या ठाण्यातील प्रारंभ कला अकॅडमी या सामाजिक संस्थेच्या “आम्ही साऱ्याजणी” महिला महोत्सवात यंदा राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या राष्ट्रीय भारूडकार चंदाताई तिवाडी यांची लोककला सादर होणार आहे. ह्या महोत्सवाचे हे १३ वे वर्ष आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील आयलीफ बँक्वेट हॉलमध्ये ०८ नोव्हें. रोजी दुपारी ३:३० ते रात्रौ ८:३० या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्या चार दांपत्यांसह उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचाही सत्कार केला जाणार आहे. तरी विनामुल्य प्रवेश असलेल्या या महोत्सवात ठाणेकरांनी सहभागी व्हावे. असे आवाहन प्रारंभच्या संचालिका डॉ. अरुंधती भालेराव यांनी पत्रकार परिषदेत केले. प्रारंभच्या महिला महोत्सवाच्या निमित्ताने ०५ नोव्हे.ला डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात महिलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या विविध स्पर्धासह १८ ते ३५ वर्षे आणि त्यापुढील वयोगटातील महिलांसाठी गीत गायन, समुह नृत्य आणि एकल नृत्य स्पर्धां होणार आहेत. या स्पर्धामधील विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभ ०८ नोव्हे. रोजी आर मॉलमधील आयलीफ सभागृहात होणार असुन सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, ज्येष्ठ समाजसेविका रेणु गावसकर प्रमुख पाहुण्या असतील. याप्रसंगी पितांबरी प्रॉडक्टसचे व्यवस्थापकिय संचालक रविंद्र प्रभुदेसाई, सुधाताई म्हैसकर, नानजी पटेल, चित्रपट निर्मात्या अपर्णा पाडगावकर, प्रतिष आंबेकर, पोलीस महानिरिक्षक संजय दराडे, डॉ.सचिन पैठणकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात भारूडकार चंदाताई तिवाडी यांची लोककला सादर होणार असुन आयपीएस समीर वानखेडे आणि अभिनेत्री क्रांती रेडकर या दांपत्याची मुलाखत डॉ. अरुंधती भालेराव घेणार आहेत.
Read More
ठाण्यात सह जिल्हा निबंधक कार्यालयातील वरिष्ठ लिपिकासह आणखी एकाला ७० हजार रुपयांच्या लाचप्रकरणी रंगेहात अटकठाणे : ठाणे येथील सह जिल्हा निबंधक वर्ग १ कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाने खासगी इसमामार्फत ७० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सापळा रचत त्या दोघांना रंगेहात पकडले. तक्रारदार यांच्या आईने सन १९८७ मध्ये भाईंदर पश्चिम येथील शांती विहार नगर परिसरात असलेल्या जयलक्ष्मी को-ऑप. हौसिंग सोसायटीमधील गाळा क्रमांक ११ खरेदी केला होता. शासनाच्या अभय योजना २००८ अंतर्गत त्या मालमत्तेचे नियमितीकरण करण्यासाठी मुळ खरेदीखत सह निबंधक कार्यालयात सन २००९ मध्ये जमा करण्यात आले होते.अलीकडे तक्रारदार यांनी ते खरेदीखत परत मिळवण्यासाठी ठाणे येथील सह निबंधक वर्ग १ कार्यालयात संपर्क साधला असता, संबंधित वरिष्ठ लिपिक दिपक इसळ यांच्यामार्फत खासगी इसम अजित कोकमकर यांनी ७० हजार रुपये लाच मागितल्याचे उघड झाले. लाच मागणीची लेखी तक्रार तक्रारदार यांनी २८ ऑक्टोबर रोजी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानुसार, पडताळणीदरम्यान इसळ व कोकमकर यांनी ७० हजारांवरून ६५ हजार रुपयांत तडजोड करून दोन टप्प्यांत रक्कम स्विकारण्याचे मान्य केले होते.त्याअनुषंगाने सापळा रचून करण्यात आलेल्या कारवाईत खासगी इसम अजित कोकमकर यांना लोकसेवक दिपक इसळ यांच्या वतीने तक्रारदारांकडून ३५ हजार रुपयांचा पहिला हप्ता स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणात दिपक इसळ यांनाही अटक करण्यात आली असून, दोघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Read Moreलोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त ठाण्यात पोलिस आयुक्तालयातर्फे “राष्ट्रीय एकता दौड” उत्साहात संपन्नठाणे पोलिस आयुक्तालयातर्फे आयोजित ‘रन फॉर युनिटी’ — नागरिकांनी दिला एकतेचा संदेश ठाणे : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त ठाणे पोलिस आयुक्तालयातर्फे आज (३१ ऑक्टोबर) सकाळी “रन फॉर युनिटी” या राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले. या दौडीला ठाणेकर नागरिक, विद्यार्थी, पोलिस कर्मचारी यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. विविधतेत एकता — हाच भारताचा खरा सौंदर्य असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या दौडीची सुरुवात शिव समर्थ विद्यालय, गडकरी रंगायतन परिसरातून झाली. तलावपाळी, शिवाजी महाराज स्मारक, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक मार्गे पुन्हा शिव समर्थ विद्यालय येथे सांगता झाली. या वेळी ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, अँटी करप्शनचे एसपी शिवराज पाटील, एसीपी शेखर बागडे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. दरम्यान या कार्यक्रमानंतर नागरिकांसाठी शस्त्र प्रदर्शन ठेवण्यात आले होते. ज्यामध्ये पुरातन काळातील व आधुनिक पिस्तूल, ५.५६ एम एम इन्सास रायफल, एके – ४७ रायफल, आदी शस्त्रांचा प्रदर्शनात समावेश होता. या शस्त्र प्रदर्शनाला नागरिकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला असून या शस्त्रांची माहिती देखील यावेळी त्यांना देण्यात आली. आयुक्त आशुतोष डुंबरे म्हणाले की, “सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताचे एकत्रीकरण घडवून देशाला स्थैर्य दिले. प्रगतीसाठी कायदा, सुव्यवस्था आणि शांतता आवश्यक असते, आणि पटेल यांच्या विचारांतून आपल्याला त्याची दिशा मिळते.” या कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली. ठाणे पोलिस आयुक्तालयाने आयोजित या एकता दौडीद्वारे देशातील ऐक्य, शांतता आणि प्रगतीचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला.
Read More
ठाण्यातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर मनसेचा येत्या शनिवारी लाँग मार्च
ठाणे : ठाण्यात वाहतुक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाल्याने मंगळवारी पत्रकार परिषद घेत मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी शनिवारी लाँग…
अंकुश चिंडालिया यांची ठाणे शहर जिल्हा कांग्रेस वॉर्ड क्रमांक २२ च्या वॉर्ड अध्यक्षपदी नियुक्ती
ठाणे :सन्माननीय ठाणे जिल्हा अध्यक्ष अँड विक्रांत चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वखाली नवनियुक्त विधानसभा १४८ – ठाणे शहर निरीक्षक श्री. श्रीरंग…
गावांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान
ठाणे : प्रत्येक गाव समृद्ध झाले तर, राज्यही समृद्ध होईल या उद्देशाने राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविण्याचा निर्णय…
नोव्हाकुर्रो नॅचरल्सचा पाळीव प्राण्यांच्या काळजीच्या क्षेत्रात विस्तार – थंडावा ते आकर्षक स्टाइलपर्यंत
ठाणे : पाळीव प्राण्यांच्या नैसर्गिक आरोग्यवर्धनासाठी नाविन्यपूर्ण उपाययोजना करणारी नोव्हाकुर्रो नॅचरल्स ही स्वदेशी कंपनी नव्या उत्साहाने पुढे सरसावत आहे. तिच्या…

