राजकारण
राष्ट्रीय ऑनलाइन भाषण प्रतियोगिता का पुरस्कार समारोह होल्करवाड़ा में उत्साह के साथ संपन्न हुआ।ठाणे: भारतीय इतिहास संस्थान, मुंबई और पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकर मेडिकल एसोसिएशन, मुंबई द्वारा संयुक्त रूप से “जागर शिवशाही से होलकरशाही” पहल के तहत आयोजित राष्ट्रीय ऑनलाइन वक्तृत्व प्रतियोगिता 2025 का भव्य पुरस्कार वितरण समारोह चांदवड के होलकरवाड़ा (रंगमहल) में बड़े उत्साह के साथ आयोजित किया गया।
श्रीमंत राजे नानासाहेब होलकर, श्रीमंत मुकुंदराजे होलकर, कार्यक्रम अध्यक्ष डॉ. देवीदास पोटे, डॉ. रमिला गायकवाड (मुंबई), प्रिंसिपल अनवर शेख (बीड),…
“जनतेच्या विश्वासावर आमची वाटचाल; विरोधकांचा पुन्हा आमच्याशी पाला, पण महायुतीच्याच गळ्यात पडणार विजयाची माला”
डॉ. नीलम गोऱ्हे यांचे दाही दिशा पुस्तक म्हणजे ‘ संघर्षगाथा’ डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या ‘दाही दिशा’ या पुस्तकाचे उपमुख्यमंत्री एकनाथ…
कातकरींच्या अस्तित्वासाठी श्रमजीवीचे आत्मक्लेशातून आत्मनिर्धार आंदोलन सुरुगुरुवारी ६ नोव्हेंबरला ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून आदिवासी बांधव जिल्हाधिकारी कार्यालयावर वस्तीच्या तयारीत धडकणारठाण्यात आत्मनिर्धार सुरु असताना श्रमजीवीच्या प्रत्येक गाव, पाड्यात उपवास करून सायंकाळी दारात लागणार आत्मक्लेशातून निर्धाराचा दिवा
ठाणे – बुधवारपासून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी कातकरींच्या विदारक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उत्तरदायित्वाची भावना म्हणून श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा आणि संस्थापक…
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसूती विभागात खाटा वाढवल्यास्वातंत्र्यसैनिक हकीम अजमल खान रुग्णालयातील एम एम व्हॅली प्रसूतिगृह होणार अद्ययावतजलद कार्यवाही करण्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले निर्देश ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसूती विभागात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या लक्षात घेऊन तेथील खाटांची संख्या वाढवून ९० करण्यात आली आहे. त्याशिवाय, मुंब्रा येथील प्रसूतिगृहाकडून येणाऱ्या रुग्णांचा ओघ लक्षात घेऊन स्वातंत्र्यसैनिक हकीम अजमल खान रुग्णालयातील एम एम व्हॅली प्रसूतिगृहास छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या विस्तारीत केंद्राचा दर्जा देऊन तेथे अद्ययावत प्रसूतीशास्त्र विभाग पूर्ण स्वरूपात लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील प्रसूती शास्त्र विभागात दररोज सुमारे २०० बाह्य रुग्ण येतात. तसेच, प्रसूती पश्चात कक्षात आता एकूण ७० खाटा उपलब्ध आहेत. उपरोक्त विभागात दररोज सरासरी १८ प्रसुती होतात. ऑक्टोबर २०२५ मध्ये दररोज २२ प्रसूती झाल्या. त्याचबरोबर, बहुतांश वेळा उपरोक्त कक्षात एकूण ९८ महिला दाखल होत्या. रुग्णालयात ठाणे महानगरपालिका क्षेत्र तसेच आजूबाजूच्या क्षेत्रातून तसेच ठाणे ग्रामीण व पालघर ग्रामीण क्षेत्रातून महिला प्रसूतीसाठी येतात. त्यामुळे बहुतांश वेळा खाटा पूर्णपणे भरलेल्या असतात. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासंदर्भात, शुक्रवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीस, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त (आरोग्य) उमेश बिरारी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट आणि रुग्णालय अधिक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर उपस्थित होते. या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथील प्रसूतीविभागावर येत असलेल्या ताणाची सविस्तर चर्चा झाली. त्याची कारणमिमांसा करताना दरमहा सुमारे १०० प्रसूतीपूर्व महिला या स्वातंत्र्यसैनिक हकीम अजमल खान रुग्णालय येथील प्रसूतीगृहातून पाठवल्या जात असल्याचे निदर्शनास आले. या प्रसुतीगृहात आप्तकालीन सिझेरियन सेक्शन शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून दिल्यास तेथून प्रसूतीसाठी महिलांना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवणे कमी होईल, त्यातून प्रसूती विभागावर असलेला ताण कमी होऊन तेथे खाटा उपलब्ध होतील, असे अधिष्ठाता डॉ. बारोट यांनी सांगितले. त्यानुसार, स्वातंत्र्यसैनिक हकीम अजमल खान रुग्णालय येथील प्रसूतीगृहात लवकरात लवकर अद्ययावत प्रसूती सुविधा सुरू करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ नियुक्त करणे, साधनसामुग्री घेणे आदी कामांचा आराखडा सोमवारी सादर करावा, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत. हा प्रसूतीविभाग, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे विस्तारीत केंद्र म्हणून जलद सुरू करण्याचेही स्पष्ट निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत.
Read More
गृहसंकुलाला सहा महिन्यांत टँकरपोटी दिड कोटींचा भुर्दंड पाणीटंचाईमुळे टँकरलॉबी सुसाट सक्षम पाणी व्यवस्थेशिवाय नवीन इमारतींना परवानगी नको – आ. संजय केळकरघोडबंदरमधील एका गृहसंकुलाने सहा महिन्यांत लाखो रुपये पाणी बिल अदा करतानाच त्यांना पाणीटंचाईमुळे टँकरपोटी तब्बल दीड कोटी रुपयांचा भुर्दंड सोसावा लागल्याची बाब जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात उघडकीस आली. पाणी टंचाईमुळे येथील टँकरलॉबी उन्मत्त झाली असून जोपर्यंत सक्षम पाणी व्यवस्था निर्माण होत नाही तोपर्यंत नवीन इमारतींना परवानगी देऊ नका, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी पुन्हा एकदा केली आहे.भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात घोडबंदर परिसरातील गृहसंकुलांच्या रहिवासी प्रतिनिधींनी भेट घेत पाणीटंचाईबाबत तक्रार केली. या तक्रारीनुसार महावीर कल्पवृक्ष ऑर्किड सोसायटीने सहा महिन्यांत ठाणे महापालिकेचे लाखो रुपयांची पाणीपट्टी अदा केली. तसेच पाणी अपुरे मिळत असल्याने या सोसायटीने या काळात दीड कोटी रुपये देखील खासगी पाण्याच्या टँकरपोटी अदा केल्याची बाब उघडकीस आली. दुसऱ्या गृहसंकुलाने १७ लाखांची पाणीपट्टी अदा केलीच, शिवाय टँकरपोटी १३ लाखही अदा केल्याची माहिती या कार्यक्रमात मिळाली.श्री. केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी ताबडतोब फोनवरून चर्चा करून उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. याबाबत बोलताना श्री.केळकर म्हणाले, नागरिक कर्ज घेऊन कोट्यवधी रुपयांची घरे घेतात, पण पुरेशा पाण्याअभावी त्यांना टँकरपोटी कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड सोसावा लागतो. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर या आधीही जोपर्यंत सक्षम पाणी व्यवस्था निर्माण होत नाही तोपर्यंत नवीन गगनचुंबी इमारतींना परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी केली होती, मात्र महापालिका पुरेसे पाणी देण्यात अपयशी ठरत असताना आजही उंचच उंच इमारतींना परवानग्या दिल्या जात आहेत. त्यामुळे टँकर लॉबीला पोसण्याचे काम होत असल्याचा आरोप श्री.केळकर यांनी केला आहे. शीळमध्ये नऊ मोठी गृहसंकुले असून येथे दिवसातून एक तास देखील पाणी मिळत नसल्याबाबत श्री. केळकर यांनी संताप व्यक्त केला. आपला दवाखानामधील कर्मचाऱ्यांनी देखील जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात हजेरी लावली. आपला दवाखाना बंद झाला असून यावर टीकेची झोड उठवल्यानंतर कर्मचाऱ्यांना रखडलेले पगार देण्याचा निर्णय झाला, परंतु अद्याप त्यांना पगार मिळाले नसल्याने श्री.केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून दोन दिवसांत वेतन अदा करण्याच्या सूचना केल्या. या कर्मचाऱ्यांना आपला दवाखाना यंत्रणेचा अनुभव असल्याने त्यांना आरोग्य मंदिरे या योजनेत संधी मिळावी यासाठी प्रशासनाशी बोलणे झाल्याचेही श्री.केळकर यांनी सांगितले. कार्यक्रमात परिवहन सेवेतील कंत्राटी कामगारांचे वेतन, बिल्डरांकडून फसवणूक, सफाई कामगारांचे प्रश्न याबाबत निवेदने प्राप्त झाली.यावेळी माजी उपमहापौर अशोक भोईर, ठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, भाजपचे शहर उपाध्यक्ष महेश कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Read More

