गृहसंकुलाला सहा महिन्यांत टँकरपोटी दिड कोटींचा भुर्दंड पाणीटंचाईमुळे टँकरलॉबी सुसाट सक्षम पाणी व्यवस्थेशिवाय नवीन इमारतींना परवानगी नको – आ. संजय केळकरघोडबंदरमधील एका गृहसंकुलाने सहा महिन्यांत लाखो रुपये पाणी बिल अदा करतानाच त्यांना पाणीटंचाईमुळे टँकरपोटी तब्बल दीड कोटी रुपयांचा भुर्दंड सोसावा लागल्याची बाब जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात उघडकीस आली. पाणी टंचाईमुळे येथील टँकरलॉबी उन्मत्त झाली असून जोपर्यंत सक्षम पाणी व्यवस्था निर्माण होत नाही तोपर्यंत नवीन इमारतींना परवानगी देऊ नका, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी पुन्हा एकदा केली आहे.भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात घोडबंदर परिसरातील गृहसंकुलांच्या रहिवासी प्रतिनिधींनी भेट घेत पाणीटंचाईबाबत तक्रार केली. या तक्रारीनुसार महावीर कल्पवृक्ष ऑर्किड सोसायटीने सहा महिन्यांत ठाणे महापालिकेचे लाखो रुपयांची पाणीपट्टी अदा केली. तसेच पाणी अपुरे मिळत असल्याने या सोसायटीने या काळात दीड कोटी रुपये देखील खासगी पाण्याच्या टँकरपोटी अदा केल्याची बाब उघडकीस आली. दुसऱ्या गृहसंकुलाने १७ लाखांची पाणीपट्टी अदा केलीच, शिवाय टँकरपोटी १३ लाखही अदा केल्याची माहिती या कार्यक्रमात मिळाली.श्री. केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी ताबडतोब फोनवरून चर्चा करून उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. याबाबत बोलताना श्री.केळकर म्हणाले, नागरिक कर्ज घेऊन कोट्यवधी रुपयांची घरे घेतात, पण पुरेशा पाण्याअभावी त्यांना टँकरपोटी कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड सोसावा लागतो. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर या आधीही जोपर्यंत सक्षम पाणी व्यवस्था निर्माण होत नाही तोपर्यंत नवीन गगनचुंबी इमारतींना परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी केली होती, मात्र महापालिका पुरेसे पाणी देण्यात अपयशी ठरत असताना आजही उंचच उंच इमारतींना परवानग्या दिल्या जात आहेत. त्यामुळे टँकर लॉबीला पोसण्याचे काम होत असल्याचा आरोप श्री.केळकर यांनी केला आहे. शीळमध्ये नऊ मोठी गृहसंकुले असून येथे दिवसातून एक तास देखील पाणी मिळत नसल्याबाबत श्री. केळकर यांनी संताप व्यक्त केला. आपला दवाखानामधील कर्मचाऱ्यांनी देखील जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात हजेरी लावली. आपला दवाखाना बंद झाला असून यावर टीकेची झोड उठवल्यानंतर कर्मचाऱ्यांना रखडलेले पगार देण्याचा निर्णय झाला, परंतु अद्याप त्यांना पगार मिळाले नसल्याने श्री.केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून दोन दिवसांत वेतन अदा करण्याच्या सूचना केल्या. या कर्मचाऱ्यांना आपला दवाखाना यंत्रणेचा अनुभव असल्याने त्यांना आरोग्य मंदिरे या योजनेत संधी मिळावी यासाठी प्रशासनाशी बोलणे झाल्याचेही श्री.केळकर यांनी सांगितले. कार्यक्रमात परिवहन सेवेतील कंत्राटी कामगारांचे वेतन, बिल्डरांकडून फसवणूक, सफाई कामगारांचे प्रश्न याबाबत निवेदने प्राप्त झाली.यावेळी माजी उपमहापौर अशोक भोईर, ठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, भाजपचे शहर उपाध्यक्ष महेश कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Read More

श्री विठ्ठलाच्या भव्य मूर्तीेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अनावरणपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट, उपवन येथे झाला सोहळापरिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के यांची उपस्थिती ठाणे : सावळ्या विठ्ठलाच्या या भव्य मूर्तीमुळे हा परिसर आणखी पवित्र झाला असून ठाण्याला प्रति पंढरीचे रूप प्राप्त झाले असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट, उपवन येथील श्री विठ्ठलाच्या भव्य मूर्तीेच्या अनावरण सोहळ्य़ात केले.उपवन तलाव परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट तयार झाला. तिथे आता ही सगळ्यात मोठी विठ्ठल मूर्ती साकारली आहे. साक्षात पांडुरंग इथे आलेला आहे, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. या सोहळ्यास, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर एच. एस. पाटील, निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर), माजी नगरसेवक परिषा सरनाईक, विहंग सरनाईक, पूर्वेश सरनाईक, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड, कार्यकारी अभियंता संजय कदम आदी उपस्थित होते. महाराष्ट्रामध्ये मी अनेक उद्घाटन लोकार्पण भूमिपूजन केली. अडीच वर्षात, मुख्यमंत्री असताना अनेक लोकाभिमुख प्रकल्प पुढे नेले. लोकाभिमुख कल्याणकारी योजनाही केल्या. परंतु, आजचा सोहळा आतापर्यंत झालेल्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये आगळावेगळा असा सोहळा आहे, असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. ही शिवरायांची, वीरांची आणि संतांची भूमी आहे. वारकरी संप्रदाय फार मोठी एक शक्ती या महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणून मुख्यमंत्री असताना वारकरी दिंड्यांना अनुदान सुरू केले. असे अनुदान देणारे पहिला आपले पाहिले सरकार. वारकऱ्यांचा विमा काढण्याचा निर्णय घेतला. दिंड्या टोल फ्री केल्या, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.गोरगरिबांच्या या देवाची मूर्ती उभी करू अशी विनंती केली आणि ती त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी मान्य केली. त्यातून आजचा हा सोहळा शक्य झाला. अशा एकूण चार भव्य मूर्ती आहेत. त्यापैकी एक राम मंदिर तलाव येथे तर उर्वरित दोन मीरा भाईंदर मध्ये होणार आहेत, असे याप्रसंगी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.या सोहळ्यानंतर, निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन झाले.ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील उपवन तलावाच्या परिसरात विविध विकास कामे करण्यासाठी राज्य शासनाकडून महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयीसुविधांचा विकास या अंतर्गत निधी उपलब्ध झाला आहे. त्यात, ५१ फुटांची भव्य श्री विठ्ठल मूर्ती उभारण्यात आली आहे. त्याचे मूर्तीकार, कोल्हापूरचे सतीश घारगे आहेत. या मूर्तीसह, दगडी पायवाट, सुशोभीकरण, विठ्ठल मुर्ती मागील भिंत, रस्त्याच्या बाजूची संरक्षक भिंत आदी कामे करण्यात आली आहेत.

Read More

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित भाजप आयोजित राष्ट्रीय एकता दौडला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादठाणे : लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ठाण्यात भाजपातर्फे शुक्रवारी 31 ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता “रन फॉर युनिटी राष्ट्रीय एकता दौड” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या एकता दौडची सुरुवात तलावपाळी येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकापासून झाली असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ या दौडची सांगता झाली. यावेळी एक भारत, श्रेष्ठ भारत, भारत माता की जय, वंदे मातरम् आदी घोषणांनी तलाव पाळी परिसर दुमदुमून गेले. यावेळी भाजपा ठाणे शहर आमदार संजय केळकर, माजी नगरसेवक संजय वाघुले, माजी नगरसेवक रमेश आंब्रे, माजी नगरसेवक महेश कदम, माजी नगरसेविका मृणाल पेंडसे, माजी नगरसेविका स्नेहा आंब्रे, माजी नगरसेविका प्रतिभा माधवी यांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि इतर स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read More

महिला महोत्सवात राष्ट्रीय भारूडकार चंदाताई तिवाडी यांची लोककलाप्रारंभ कला अकॅडमीतर्फे आयलीफ बँक्वेट हॉलमध्ये ०८ नोव्हेंबरला भव्य आयोजनठाणे: सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात गेली २३ वर्ष कार्यरत असलेल्या ठाण्यातील प्रारंभ कला अकॅडमी या सामाजिक संस्थेच्या “आम्ही साऱ्याजणी” महिला महोत्सवात यंदा राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या राष्ट्रीय भारूडकार चंदाताई तिवाडी यांची लोककला सादर होणार आहे. ह्या महोत्सवाचे हे १३ वे वर्ष आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील आयलीफ बँक्वेट हॉलमध्ये ०८ नोव्हें. रोजी दुपारी ३:३० ते रात्रौ ८:३० या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्या चार दांपत्यांसह उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचाही सत्कार केला जाणार आहे. तरी विनामुल्य प्रवेश असलेल्या या महोत्सवात ठाणेकरांनी सहभागी व्हावे. असे आवाहन प्रारंभच्या संचालिका डॉ. अरुंधती भालेराव यांनी पत्रकार परिषदेत केले. प्रारंभच्या महिला महोत्सवाच्या निमित्ताने ०५ नोव्हे.ला डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात महिलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या विविध स्पर्धासह १८ ते ३५ वर्षे आणि त्यापुढील वयोगटातील महिलांसाठी गीत गायन, समुह नृत्य आणि एकल नृत्य स्पर्धां होणार आहेत. या स्पर्धामधील विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभ ०८ नोव्हे. रोजी आर मॉलमधील आयलीफ सभागृहात होणार असुन सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, ज्येष्ठ समाजसेविका रेणु गावसकर प्रमुख पाहुण्या असतील. याप्रसंगी पितांबरी प्रॉडक्टसचे व्यवस्थापकिय संचालक रविंद्र प्रभुदेसाई, सुधाताई म्हैसकर, नानजी पटेल, चित्रपट निर्मात्या अपर्णा पाडगावकर, प्रतिष आंबेकर, पोलीस महानिरिक्षक संजय दराडे, डॉ.सचिन पैठणकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात भारूडकार चंदाताई तिवाडी यांची लोककला सादर होणार असुन आयपीएस समीर वानखेडे आणि अभिनेत्री क्रांती रेडकर या दांपत्याची मुलाखत डॉ. अरुंधती भालेराव घेणार आहेत.

Read More

ठाण्यात सह जिल्हा निबंधक कार्यालयातील वरिष्ठ लिपिकासह आणखी एकाला ७० हजार रुपयांच्या लाचप्रकरणी रंगेहात अटकठाणे : ठाणे येथील सह जिल्हा निबंधक वर्ग १ कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाने खासगी इसमामार्फत ७० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सापळा रचत त्या दोघांना रंगेहात पकडले. तक्रारदार यांच्या आईने सन १९८७ मध्ये भाईंदर पश्चिम येथील शांती विहार नगर परिसरात असलेल्या जयलक्ष्मी को-ऑप. हौसिंग सोसायटीमधील गाळा क्रमांक ११ खरेदी केला होता. शासनाच्या अभय योजना २००८ अंतर्गत त्या मालमत्तेचे नियमितीकरण करण्यासाठी मुळ खरेदीखत सह निबंधक कार्यालयात सन २००९ मध्ये जमा करण्यात आले होते.अलीकडे तक्रारदार यांनी ते खरेदीखत परत मिळवण्यासाठी ठाणे येथील सह निबंधक वर्ग १ कार्यालयात संपर्क साधला असता, संबंधित वरिष्ठ लिपिक दिपक इसळ यांच्यामार्फत खासगी इसम अजित कोकमकर यांनी ७० हजार रुपये लाच मागितल्याचे उघड झाले. लाच मागणीची लेखी तक्रार तक्रारदार यांनी २८ ऑक्टोबर रोजी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानुसार, पडताळणीदरम्यान इसळ व कोकमकर यांनी ७० हजारांवरून ६५ हजार रुपयांत तडजोड करून दोन टप्प्यांत रक्कम स्विकारण्याचे मान्य केले होते.त्याअनुषंगाने सापळा रचून करण्यात आलेल्या कारवाईत खासगी इसम अजित कोकमकर यांना लोकसेवक दिपक इसळ यांच्या वतीने तक्रारदारांकडून ३५ हजार रुपयांचा पहिला हप्ता स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणात दिपक इसळ यांनाही अटक करण्यात आली असून, दोघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Read More

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त ठाण्यात पोलिस आयुक्तालयातर्फे “राष्ट्रीय एकता दौड” उत्साहात संपन्नठाणे पोलिस आयुक्तालयातर्फे आयोजित ‘रन फॉर युनिटी’ — नागरिकांनी दिला एकतेचा संदेश ठाणे : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त ठाणे पोलिस आयुक्तालयातर्फे आज (३१ ऑक्टोबर) सकाळी “रन फॉर युनिटी” या राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले. या दौडीला ठाणेकर नागरिक, विद्यार्थी, पोलिस कर्मचारी यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. विविधतेत एकता — हाच भारताचा खरा सौंदर्य असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या दौडीची सुरुवात शिव समर्थ विद्यालय, गडकरी रंगायतन परिसरातून झाली. तलावपाळी, शिवाजी महाराज स्मारक, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक मार्गे पुन्हा शिव समर्थ विद्यालय येथे सांगता झाली. या वेळी ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, अँटी करप्शनचे एसपी शिवराज पाटील, एसीपी शेखर बागडे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. दरम्यान या कार्यक्रमानंतर नागरिकांसाठी शस्त्र प्रदर्शन ठेवण्यात आले होते. ज्यामध्ये पुरातन काळातील व आधुनिक पिस्तूल, ५.५६ एम एम इन्सास रायफल, एके – ४७ रायफल, आदी शस्त्रांचा प्रदर्शनात समावेश होता. या शस्त्र प्रदर्शनाला नागरिकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला असून या शस्त्रांची माहिती देखील यावेळी त्यांना देण्यात आली. आयुक्त आशुतोष डुंबरे म्हणाले की, “सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताचे एकत्रीकरण घडवून देशाला स्थैर्य दिले. प्रगतीसाठी कायदा, सुव्यवस्था आणि शांतता आवश्यक असते, आणि पटेल यांच्या विचारांतून आपल्याला त्याची दिशा मिळते.” या कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली. ठाणे पोलिस आयुक्तालयाने आयोजित या एकता दौडीद्वारे देशातील ऐक्य, शांतता आणि प्रगतीचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला.

Read More

ठाण्यातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर मनसेचा येत्या शनिवारी लाँग मार्च

ठाणे : ठाण्यात वाहतुक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाल्याने मंगळवारी पत्रकार परिषद घेत मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी शनिवारी लाँग…

Read More

अंकुश चिंडालिया यांची ठाणे शहर जिल्हा कांग्रेस वॉर्ड क्रमांक २२ च्या वॉर्ड अध्यक्षपदी नियुक्ती

ठाणे :सन्माननीय ठाणे जिल्हा अध्यक्ष अँड विक्रांत चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वखाली नवनियुक्त विधानसभा १४८ – ठाणे शहर निरीक्षक श्री. श्रीरंग…

Read More