Jayesh Joshi

नवे सांस्कृतिक धोरण राज्याला देशात अव्वल बनविणारे – मंत्री सुधीर मुनगंटीवार

नवे सांस्कृतिक धोरण हे सर्वंकष व व्यापक असून महाराष्ट्राला देशात अव्वल बनवेल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले….

Read More

शुद्ध कल्याण रागाच्या विवेचनाने गुंफले पहिले पुष्प

डॉ वरदा गोडबोले यांच्या ‘रागसंगीत विवेचन’ कार्यक्रमाला ठाणेकरांचा उदंड प्रतिसाद नुकताच ठाण्यातील सहयोग मंदिर घंटाळी येथे नामवंत शास्त्रीय गायिका डॉ….

Read More

सरपंच व उपसरपंचांचे मानधन दुप्पट – ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन

सरपंच व उपसरपंच यांचे मानधन दुप्पट केले असून, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे एकच पद करण्याबाबत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय…

Read More

कोळी भवनाला निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोळी बांधव हा मनमोकळ्या स्वभावाचा आहे. त्याच्या मनात एक अन् पोटात एक असं कधीचं नसतं. कोळी बांधव प्रामाणिकपणे आपला व्यवसाय…

Read More

आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील मुलींनो व्यावसायिक शिक्षण घ्या मोफत..!

उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग व कृषी व पशु संवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व…

Read More

कांचनअधिकारीयांच्यानव्याआशयघन ‘जन्मऋण’ चित्रपटाचेपोस्टर लॉन्च

अत्यंत जिव्हाळ्याचा आशयघन विषय घेऊन प्रसिद्ध अभिनेत्री, लेखिका, निर्माती आणि दिग्दर्शक कांचन अधिकारी  ‘जन्मऋण’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सत्यघटनेवर आधारित असलेल्या या…

Read More

‘मोऱ्या’ सुपरहिट

अनेक अडचणींवर मात करीत अत्यंत चतुराईने ‘मोऱ्या’ हा मराठी भाषेतील चित्रपट २२ मार्च २०२४ रोजी प्रथम प्रदर्शित करण्यात आला. निर्मात्यांची विशेष लक्ष पुरवून चित्रपटाच्या कल्पक वितरणासोबत आधुनिक आणि पारंपरिक पद्धतीची सांगड घालत प्रसिद्धी व मार्केटिंग व्यवस्थापन करून मुंबई, व उपनगर, पुणे आणि धुळे या केंद्रांवर लक्ष केंद्रित करून आपला जम बसवत प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे येण्यासाठी आकर्षित केले आहे. ऐन राजकीय शिमग्याच्या आयपीएल मोसमात ‘मोऱ्या’ खरोखर प्रेक्षकांसाठी आकर्षण ठरला आहे. विशेष आकर्षण निर्माण करणारे पोस्टर आणि अत्यंत नजाकतीने कापलेला चित्रपटाचा सुबक ट्रेलर, चित्रपटाचे वेगळे कथागुणधर्म, कलाकारांचा नैसर्गिक अभिनय, संगीत आणि सोशल मीडियावरील चर्चा, पोस्ट पाहून प्रेक्षकांची पाऊले आपसूकच चित्रपटगृहाच्या दिशेने वळत असल्याने विशेष आनंद होत असल्याची प्रतिक्रिया मोऱ्याची शीर्षक भूमिका करणारे अभिनेते आणि लेखक दिग्दर्शक जितेंद्र बर्डे यांनी दिली आहे. मराठी चित्रपटांच्या ट्रेंड पेक्षा वेगळा विषय असलेल्या ‘मोऱ्या’ला मिळत असलेला “द्विगुणित करणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद आमचा उत्साह वाढवीत असून सर्व टीमने तीन वर्षे घेतलेली मेहनत खऱ्या अर्थाने यशस्वी झाली आहे. येत्या आठवड्यात ‘मोऱ्या’ महाराष्ट्रातील उर्वरित ठिकाणी आम्ही प्रदर्शित करू, मराठी रसिकांचे प्रेम आम्हाला असेच मिळणार आहे” असे ‘मोऱ्या’च्या सर्व निर्मात्यांनी म्हटले आहे.

Read More

मकरंद अनासपूरे, भुषण प्रधान, प्रार्थना बेहेरे आणि सयाजी शिंदे यांचा ‘रंगीत’ चित्रपट

आयुष्य जेव्हा रंगीत असतं, तेव्हा प्रेमात आलेला विरह म्हणजे अपघाताने कॅनवासवर पडलेला काळा रंग. अशा या विरहामागे एक रहस्यमय घटना असेल तर? एक रहस्यमय आणि रंगहीन घटना ‘रंगीत’या चित्रपटात दडून बसली आहे, जी प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारी आहे. ‘रंगीत’ दिनांक १७ मे २०२४ रोजी थेट ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांना आजवर न मिळालेल्या एका थरारक चित्रपटाचा मनमुराद आस्वाद घेता येणार आहे.  चित्रपटाची कथा एका फाईन आर्ट्स महाविद्यालयाच्या आवारात फिरते. विरहाच्या नैराश्येमुळे कायम नशेत असणारा सिद्धार्थ महाविद्यालयच्या आवारात फिरत आहे. महाविद्यालयात नव्यानेच प्रवेश घेतलेल्या शिवाला आवारात एका स्त्रीच्या आत्म्याचा भास होत आहे. आत्म्याचा आणि सिद्धार्थच्या प्रियसीचा चेहरा एकच असल्याचं लक्षात येतं. पण त्याला अचानक सोडून गेलेली प्रियसी मरण पावली कशी याचा शोध सुरू होतो. तिच्या मरणाचं कारण भयंकर असून त्यामागील रहस्यमय कथा प्रेक्षकांना चित्रपटात पहायला मिळणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रज्योत दिवाकरराव कडू यांनी केले असून मकरंद अनासपूरे, सयाजी शिंदे, भूषण प्रधान आणि प्रार्थना बेहेरे या स्टार अभिनेत्यांनी चित्रपटात आपल्या अनोख्या भूमिका साकार केल्या आहेत.  “मराठी मातीतल्या चित्रपटांमध्ये अनेकानेक प्रयोग व्हावेत असं नेहमी वाटतं. अशाच एका प्रयोगातून जन्मलेला हा ‘रंगीत’चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच मनोरंजनाच्या शिखरावर पोहचवेल याची शास्वती वाटते. म्हणून ‘रंगीत’ सारखा चित्रपट थेट अल्ट्रा झकास ओटीटीवर प्रदर्शित करत आहोत.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

Read More

ठाण्यातील न्यू गर्ल्स स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय झाले ‘लोकराज्य-कनिष्ठ महाविद्यालय!’

‘लोकराज्य’ या शासनाच्या मुखपत्राचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे महत्त्व लक्षात घेऊन पीपल्स एज्युकेशन सोसायटी, ठाणे संचलित न्यू गर्ल्स स्कूल व…

Read More

‘महावाचन उत्सव’ उपक्रमांतर्गत एक लाख शाळांची नोंदणी

विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने राज्यात शालेय शिक्षण विभागामार्फत ‘महावाचन उत्सव’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत 25 सप्टेंबर 2024 पर्यंत एक…

Read More