नोव्हाकुर्रो नॅचरल्सचा पाळीव प्राण्यांच्या काळजीच्या क्षेत्रात विस्तार – थंडावा ते आकर्षक स्टाइलपर्यंत

ठाणे : पाळीव प्राण्यांच्या नैसर्गिक आरोग्यवर्धनासाठी नाविन्यपूर्ण उपाययोजना करणारी नोव्हाकुर्रो नॅचरल्स ही स्वदेशी कंपनी नव्या उत्साहाने पुढे सरसावत आहे. तिच्या प्रमुख उत्पादनांपैकी ‘कूलसिम’ – थंडावा देणारे अँटिसेप्टिक मिस्ट, आणि ‘ओ-नो-पेन’ – वेदनाशामक हर्बल उपाय, यांच्या यशस्वी लाँचनंतर आता कंपनी पाळीव प्राण्यांच्या स्टाइलच्या जगात पाऊल टाकत आहे. आराम, टिकाऊपणा आणि आकर्षकतेचा संगम असलेल्या नवीन हार्नेस व लीशेसच्या श्रेणीची घोषणा करण्यात आली आहे.

प्राण्यांच्या आरोग्याबाबत कंपनी एवढ्यावरच थांबलेली नाही. नोव्हाकुर्रो नॅचरल्सच्या प्रयोगशाळेत सध्या टिक-नियंत्रणासाठी एक विशेष फॉर्म्युलेशन तयार होत आहे, जे लवकरच कंपनीच्या ग्रूमिंग विभागात दाखल होणार आहे. हे नाविन्यपूर्ण उत्पादन सुरक्षित, नैसर्गिक आणि विज्ञाननिष्ठ देखभालीच्या वचनाला अनुसरून पाळीव प्राण्यांना परजीवींपासून दूर ठेवणार आहे.

“आपल्या पाळीव प्राण्यांना जसे प्रेम मिळते तसेच त्यांना विचारपूर्वक, उपयुक्त उत्पादनेही मिळायला हवीत,” असे वैदेही गुप्ते, संस्थापक – नोव्हाकुर्रो नॅचरल्स यांनी सांगितले. “आम्ही प्रत्येक नवीन उत्पादनासह केवळ शेल्फवरील वस्तू वाढवत नाही, तर पाळीव प्राण्यांचे जीवन, खेळ व आरोग्य सुधारण्यासाठी पावले उचलत आहोत असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *