ठाणे : धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे जुने विश्वासू सहकारी व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही विश्वासू सहकारी शिवसेना ठाणे शहर समन्वयक श्री प्रकाश पायरे यांचा वाढदिवस काल दिनांक 10 सप्टेंबर रोजी मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला
प्रकाश पायरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिवसभर विविध समाज उपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले
होते
तर आदल्या दिवशी रात्री पासूनच शुभेच्छाचा वर्षाव सुरु होता
प्रकाश पायरे यांना यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना नेते एकनाथजी शिंदे, तसेच अनेक मान्यवरांनी फोन करून शुभेच्छा दिल्या तर नौपाडा येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यलयात अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी शुभेच्छा देण्यासाठी ठाणे लोकसभेचे खासदार व शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेशजी म्हस्के तसेच ठाणे विधानसभा शहरप्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक व विभागप्रमुख पवन कदम, माजी नगरसेवक भास्कर पाटील,ठाणे लोकसभा सचिव बाळा गवस,नौपाडा विभाग प्रमुख किरण नाकती, ठाणे परिवहन समितीचे माजी सदस्य राजेश मोरे,समाजसेवक प्रितम राजपूत समाजसेविका सिमा प्रितम राजपूत,शिवसेना सचिव राजु कुलकर्णी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाहक सर्वेश झेंडे, गोरस गृहाचे मालक श्री पुराणिक, गुजराथी समाजाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध जेष्ठ नागरिक संघांचे पदाधिकारी, सभासद व इतर मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते सर्व शिवसैनिक, सर्व उपविभागप्रमुख, सर्व शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, महिला आघाडी, हितचिंतक, प्रकाश पायरे मित्र परिवार, आप्तेष्ठ बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी शुभेच्छा दयायला आलेल्या व फोन, मोबाईल, वॉट्स ऍप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर या माध्यमातून ही शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे शिवसेना ठाणे शहर समन्वयक श्री प्रकाश पायरे यांनी आभार मानले.

