ठाणे : धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे विश्वासू व लाडके कमु तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही विश्वासू सहकारी
शिवसेना विभागप्रमुख श्री कमलेश चव्हाण यांचा वाढदिवस दिनांक 9 सप्टेंबर रोजी मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला
कमलेश चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिवसभर विविध समाज उपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते
तर आदल्या दिवशी रात्री पासूनच शुभेच्छाचा वर्षाव सुरु होता
कमलेश चव्हाण यांना यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना नेते एकनाथजी शिंदे, तसेच खासदार नरेशजी म्हस्के, माजी आमदार रवींद्रजी फाटक यांनी फोन करून शुभेच्छा दिल्या तर टेंभी नाका येथे अभिष्टचिंतन सोहळ्यात शुभेच्छा देण्यासाठी ठाणे विधानसभा शहरप्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे,माजी नगरसेवक व विभाग प्रमुख पवन कदम, वंदनाताई डोंगरे, माजी नगरसेविका पूजा वाघ, शिवसेना ठाणे शहर विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे, ठाणे परिवहन समितीचे माजी सदस्य राजेश मोरे,नौपाडा विभाग प्रमुख किरण नाकती,समाजसेवक प्रितम रजपूत, संतोष बोडके व इतर मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते सर्व शिवसैनिक, सर्व उपविभागप्रमुख, सर्व शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, महिला आघाडी, हितचिंतक, कमलेश चव्हाण मित्र परिवार, आप्तेष्ठ बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी शुभेच्छा दयायला आलेल्या व फोन, मोबाईल, वॉट्स ऍप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर या माध्यमातून ही शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे विभागप्रमुख श्री कमलेश चव्हाण यांनी आभार मानले.

