# बनावट पत्ते देऊन पटकावली नोकरी
# पोलिसांकडून दिले गेले बनावट चारित्र्य पडताळणी दाखले
अजय जेया यांनी सांगितले की, वाहतूक विभागाने निश्चित केलेल्या नियमावलीचे पालन होत नाही. माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या कागदपत्रांनुसार, टोईंग कामगारांच्या कॅरेक्टर सर्टिफिकेट्स व पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट्समध्ये गंभीर गैरप्रकार उघडकीस आले आहेत. अनेक कामगारांनी एकच पत्ता दिलेला असून काहींनी अपूर्ण पत्ते दिल्याने त्यांची पडताळणी करणे अशक्य ठरले आहे. सलीम पठाण नावाच्या कर्मचाऱ्याचा राहण्याचा पत्ता हा सहार अपार्टमेंट, लोकमान्य नगर, फ्लॅट 503 असा दाखवला गेला आहे. मात्र, प्रत्यक्षात त्या ठिकाणी गणेश निषाद हे आणि त्यांचा परिवार रहात आहे. त्याचप्रमाणे, कोपरी परिसरात दाखवलेले पत्ते पूर्णतः बनावट असल्याचे निष्पन्न झाले असून, कसारवडवली येथे ८ जणांचा पत्ता एकच, तर मुंब्रा–कौसा येथे ७ जणांचा पत्ता एकाच ठिकाणी दाखविण्यात आले आहे. एकंदर पाहता, चारित्र्य पडताळणी ही संबंधित व्यक्तीचा खरा
*अजय जेया यांनी केला पर्दाफाश* ठाणे – टोविंग व्हॅनच्या वसुलीवरून जनआंदोलन उभारणारे अजय जेया यांनी आणखी एक महत्वाची बाब उघडकीस आणली आहे. बनावट पत्ते आणि बनावट चारित्र्य पडताळणी दाखले सादर केलेले तरूण टोविंग व्हॅनवर काम करीत आहेत. टोविंग व्हॅनवर काम करणारे हे तरूण संशयास्पद असल्याचा दावाही अजय जेया यांनी केला आहे.
काही दिवसांपूर्वीच ठाण्यातील टोविंग व्हॅन बंद कराव्यात, या मागणीसाठी अजय जेया यांनी आंदोलन उभारले होते. आता त्यांनी पत्रकार परिषद घेऊन, ठाणे वाहतूक पोलिसांच्या टोईंग व्हॅन कामकाजात गंभीर अनियमितता झाल्याचा धक्कादायक भंडाफोड केला.
पत्ता व गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यासाठी केली जाते, मात्र खोटे पत्ते वापरून अनेक कामगारांच्या खरी ओळख आणि त्यांच्या पार्श्वभूमीवरील गुन्हे झाकले गेल्याचा आरोप जेया यांनी केला.
दरम्यान, या प्रकरणाची थेट जबाबदारी ठाणे पोलिस प्रशासन व वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाठ यांचीच आहे. त्यांनी तत्काळ स्वतंत्र चौकशी समिती नेमून संशयास्पद टोईंग कामगारांना निलंबित करण्याची तसेच बनावट पडताळणी मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करून नागरिकांच्या आंदोलनानंतर वाहतूक विभागाने टोईंग व्हॅनवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आणि सर्व नियमांचे पालन करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु प्रत्यक्षात कोणतीही अंमलबजावणी झाली नाही, उलट या संपूर्ण प्रक्रियेतून मोठा घोटाळा झाल्याचा आरोपही जेया यांनी केला.

