हायलँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दोघांवर यशस्वी शस्त्रक्रिया
ठाणे: ठाणे येथील हायलँड सुपर स्पेशालिटी – हॉस्पिटलने अलिकडेच ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया (टीएन) नावाच्या एका वेगळ्या मज्जातंतूशी संबंधित समस्येने ग्रस्त असलेल्या दोन रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. या आजाराला ‘नुसाईड डिसीज’ असेही म्हणतात.
टीएन’ला बहुतेकदा वैद्यकीयशास्त्रात ज्ञात असलेल्या सर्वांत वेदनादायक वेदना विकारांपैकी -एक असे म्हणून वर्णन केले जाते. चेहऱ्यावरील वेदनांची असह्य तीव्रता आणि मानसिक आरोग्य यावर त्याचा विनाशकारी परिणाम होतो. यामुळे सामान्यतः याला सुत्ताईड डिसीज म्हणून संबोधले जाते. हा एक दुर्मिळ आजार असला तरी त्याचे वारंवार चुकीचे निदान केले जाते. ज्यामुळे अनेक रुग्णांना अनावश्यक त्रास सहन करावा लागतो. यात झोप, खाणे, संवाद आणि दैनंदिन कामकाजात यामध्ये व्यत्यय येऊ शकतो. ज्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक आणि भावनिक आरोग्य यावर खोलवर परिणाम होतो. भारतातील अग्रणी न्यूरोसर्जन आणि सल्लागार हायलैंड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल डॉ. चद्रनाथ तिवारी यानी अलिकडेच तबस्सुम हफीज आणि नामदेव पाटील या दोन रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य परत आणले. अलिकडेच बॉलिवूड अभिनेता सलमान खाननेही याव आजारावर शस्त्रक्रिया करुन घेतली होती.
प्रकारची जुनाट हायलँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील भारतातील आघाडीचे न्यूरोसर्जन डॉ. चंद्रनाथ तिवारी न्हणाले, “टीएन ही एक प्रकारची वेदनादायक स्थिती आहे. जी ट्रायजे मिनल नव्र्व्हला प्रभावित करते. ही एक मोठी चेहऱ्याची मज्जातंतू असून ज्यामध्ये तीन शाखा असतात. ज्या कपाळ, गाल आणि जबड्याला संवेदना पाठवतात. यात वेदना एक किंवा अधिक शाखांना प्रभावित करु शकतात आणि सामान्यपणे चेहऱ्याच्या एका बाजूलाच याचा
त्रास होतो. पण फार दुर्मिळ प्रकरणांमध्ये दोन्ही बाजूंनाही होऊ शकतो.” डॉ. चंद्रनाथ तिवारी पुढे म्हणाले, ही स्थिती
50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये सर्वात सामान्य आहे. तरी ती कोणत्याही वयात होऊ शकते. असा अंदाज आहे की एकट्या अमेरिकेत दरवर्षी सुमारे 1.5 लाख नवीन प्रकरणे निदान केली जातात. टीएनची पुष्टी करण्यासाठी कोणतीही एकच चाचणी नाही, म्हणूनच टीएमचे निदानकरणे आव्हानात्मक ठरते. कारण मायग्रेन, सायनस इन्फेक्शन किंवा टेम्पोरोमंडिब्युलर जॉइंट (टीएनजे) सारख्या अनेक इतर परिस्थिती (टान) विकारांमुळे देखील चेहऱ्यावर वेदना होतात.
टीएनसह जगणे भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या थकवणारे असू शकते. परंतु तुम्हाला एकट्याला त्रास सहन करावा लागत नाही. यामध्ये बरे होणे शक्य आहे. जर कोणाला तीव्र किंवा अस्पष्ट चेहऱ्यावरील वेदना होत असतील तर न्यूरोलॉजिस्ट किंवा वेदना तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. याबाबत ते पुढे म्हणाले की, “वेदनांची तीव्रता शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या विनाशकारी असू शकते. टीएनचे झटके सामान्यपणे काही काळासाठी थांबतात आणि नंतर परत येतात. कंपन किंवा गालाशी संपर्क साधल्याने वेदनांचे झटके येऊ शकतात. जसे की दाही करताना, चेहरा धुताना किंवा मेकअप करताना, दात घासताना, नाक फुंकताना, खाताना, पिताना, बोलत असताना किंवा वाऱ्याच्या संपर्कात आल्यानंतर. यात वेदना चेहऱ्याच्या एका लहान भागावर परिणाम करू शकतात किंवा त्या पसरु सुद्धा शकतात. झोपेच्या वेळी वेदना क्वचितच होतात. काही प्रकरणांमध्ये ही स्थिती प्रगतीशील असू शकते. म्हणजेच झटके कालातराने आणखी वाईट होऊ शकतात. अर्थात दीर्घ आणि वारंवार येऊ शकतात.”
हायलँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दोघांवर यशस्वी शस्त्रक्रिया

