आरोग्य कृषी खेळ ठाणे पर्यावरण मनोरंजन राजकारण व्हिडिओ शैक्षणिकसंघर्ष वृत्तवाहिनी बातमी 01-11-2025 Jayesh JoshiNovember 1, 2025November 7, 202501 mins Post navigation Previous: लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित भाजप आयोजित राष्ट्रीय एकता दौडला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादठाणे : लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ठाण्यात भाजपातर्फे शुक्रवारी 31 ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता “रन फॉर युनिटी राष्ट्रीय एकता दौड” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या एकता दौडची सुरुवात तलावपाळी येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकापासून झाली असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ या दौडची सांगता झाली. यावेळी एक भारत, श्रेष्ठ भारत, भारत माता की जय, वंदे मातरम् आदी घोषणांनी तलाव पाळी परिसर दुमदुमून गेले. यावेळी भाजपा ठाणे शहर आमदार संजय केळकर, माजी नगरसेवक संजय वाघुले, माजी नगरसेवक रमेश आंब्रे, माजी नगरसेवक महेश कदम, माजी नगरसेविका मृणाल पेंडसे, माजी नगरसेविका स्नेहा आंब्रे, माजी नगरसेविका प्रतिभा माधवी यांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि इतर स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.Next: श्री विठ्ठलाच्या भव्य मूर्तीेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अनावरणपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट, उपवन येथे झाला सोहळापरिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के यांची उपस्थिती ठाणे : सावळ्या विठ्ठलाच्या या भव्य मूर्तीमुळे हा परिसर आणखी पवित्र झाला असून ठाण्याला प्रति पंढरीचे रूप प्राप्त झाले असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट, उपवन येथील श्री विठ्ठलाच्या भव्य मूर्तीेच्या अनावरण सोहळ्य़ात केले.उपवन तलाव परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट तयार झाला. तिथे आता ही सगळ्यात मोठी विठ्ठल मूर्ती साकारली आहे. साक्षात पांडुरंग इथे आलेला आहे, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. या सोहळ्यास, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर एच. एस. पाटील, निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर), माजी नगरसेवक परिषा सरनाईक, विहंग सरनाईक, पूर्वेश सरनाईक, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड, कार्यकारी अभियंता संजय कदम आदी उपस्थित होते. महाराष्ट्रामध्ये मी अनेक उद्घाटन लोकार्पण भूमिपूजन केली. अडीच वर्षात, मुख्यमंत्री असताना अनेक लोकाभिमुख प्रकल्प पुढे नेले. लोकाभिमुख कल्याणकारी योजनाही केल्या. परंतु, आजचा सोहळा आतापर्यंत झालेल्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये आगळावेगळा असा सोहळा आहे, असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. ही शिवरायांची, वीरांची आणि संतांची भूमी आहे. वारकरी संप्रदाय फार मोठी एक शक्ती या महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणून मुख्यमंत्री असताना वारकरी दिंड्यांना अनुदान सुरू केले. असे अनुदान देणारे पहिला आपले पाहिले सरकार. वारकऱ्यांचा विमा काढण्याचा निर्णय घेतला. दिंड्या टोल फ्री केल्या, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.गोरगरिबांच्या या देवाची मूर्ती उभी करू अशी विनंती केली आणि ती त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी मान्य केली. त्यातून आजचा हा सोहळा शक्य झाला. अशा एकूण चार भव्य मूर्ती आहेत. त्यापैकी एक राम मंदिर तलाव येथे तर उर्वरित दोन मीरा भाईंदर मध्ये होणार आहेत, असे याप्रसंगी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.या सोहळ्यानंतर, निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन झाले.ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील उपवन तलावाच्या परिसरात विविध विकास कामे करण्यासाठी राज्य शासनाकडून महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयीसुविधांचा विकास या अंतर्गत निधी उपलब्ध झाला आहे. त्यात, ५१ फुटांची भव्य श्री विठ्ठल मूर्ती उभारण्यात आली आहे. त्याचे मूर्तीकार, कोल्हापूरचे सतीश घारगे आहेत. या मूर्तीसह, दगडी पायवाट, सुशोभीकरण, विठ्ठल मुर्ती मागील भिंत, रस्त्याच्या बाजूची संरक्षक भिंत आदी कामे करण्यात आली आहेत. Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक या २०२५.आरक्षण निश्चित व सोडत कार्यक्रम. Jayesh JoshiNovember 13, 2025November 13, 20250
राष्ट्रवादी (श.प.) कार्यालयात इच्छुकांची रीघ अवघ्या 48 तासात सुमारे 73 जणांचे अर्ज Jayesh JoshiNovember 13, 2025November 13, 20250