माजिवडा गावातील नाना नानी उद्यान जेष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी संरक्षित ठेवण्याचा लढा यशस्वी

ठाणे : नाना नानी उद्यान हे जेष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी महापालिकेने संरक्षित केलेले असून, एकामागून एक सीमेंट कॉंक्रिट चे जंगल उभारण्याचा कट ठाणे महापालिकेने घातला होता, तो माजिवडा गावातील नागरिक, युवा आणि लहान मुलांच्या आंदोलनाने तसेच जनसेवक आमदार श्री. संजय जी केळकर साहेब ह्यांच्या मार्गदर्शनाखाली उद्वस्त करण्यात आला.

कुठल्याही विहिरीला संरक्षित करून त्याचे पाणी RO फिल्टर प्लांट द्वारा पुनः वापरात आणले जाते. हा प्लांट 6×6 मीटर चा असतो आणि तो त्याच विहिरीवर बांधला जातो, जेणे करून त्याचा वापर अधिक क्षमतेने करता येतो, परंतु माजिवडा मध्ये काही विकासकांच्या हस्तक्षेपामुळे हा प्लांट महापालिकेच्या जनतेसाठी आरक्षित भूखंडावर स्थलांतरित करण्यात आला. माजिवडा गावातील 30 ते 35000 लोकसंख्या असून ही ह्याच एकमेव उद्यानाचा वापर करत होती आणि तो ही हिरावून घेण्याचा घाट ठाणे महापालिकेने घातलेला होता, परंतु जागरूक नागरिकांनी आमदार साहेबांच्या मदतीने तो हाणून पाडला.

ह्यामध्ये साधारण 100 वर्षे जुने वडाचे झाड देखील बाधित झाले असून त्याचे मुळे खोदकामात तोडण्यात आली आहेत.

ह्या बांधकामाची मागणी आणि खोदकाम करणार्‍या कंत्राटदारास आणि परवानगी देणार्‍या अधिकाऱ्यावर कारवाई ची मागणी स्थानिकांनी केली आहे.
माननीय जनसेवक आमदार श्री. संजय जी केळकर साहेब ह्यानी माजिवडा गावातील उद्यानाला वाचविण्याची ही दुसरी वेळ आहे. ह्याआधी माजिवडा नाका येथील उद्यान केळकर साहेबांनी स्वतः उभे राहून नागरिकांसाठी खुले करून दिले होते.
श्री सचिन शिनगारे ह्यांनी माननीय आमदारांच्या मार्गदर्शनाखाली आणि नागरिकांच्या सहकार्याने वरील लढा यशस्वी पणे पार पाडत स्थानिक नागरिकांना न्याय मिळवून दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *