ठाणे-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज ठाणे भाजपाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. खोपट येथील भाजपाच्या कार्यालयात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत *“सेवा पंधरवडा”* आयोजित करण्यात आला असून या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
आज सेवा पंधरवड्याचा शुभारंभ करताना भाजपाच्या खोपट कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे ७५ हुन अधिक नागरिकांनी रक्तदान करून समाजसेवेची भावना व्यक्त केली.
या उपक्रमाला भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी भेट देऊन शिबिराचे निरीक्षण केले. यावेळी त्यांनी रक्तदात्यांचे अभिनंदन करताना भाजप कार्यकर्त्यांनी घेतलेल्या सामाजिक पुढाकाराचे कौतुक केले. पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली समाजाभिमुख उपक्रम राबवणे हीच खरी त्यांना दिलेली वाढदिवसाची भेट असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाचे आयोजन – *भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा*
सहयोगी संस्था तेरापंथ युवक परिषद ठाणे तसेच
भाजपचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष श्री संदीप सुरेश लेले
संयोजक सेवा पंधरवडा डॉ. समीरा समीर भारती
सहसंयोजक सेवा पंधरवडा संपर्क प्रमुख
श्री सचिन पाटील
संयोजक ब्लड डोनेशन कॅम्प श्री. विकास आच्छा –
संयोजक ब्लड डोनेशन कॅम्प श्री. सागर भदे –
अध्यक्ष वृंदावन पाचपखाडी श्री. प्रमोद घोलप
यांच्या वतीने करण्यात आले होते सदर प्रसंगी आमदार निरंजन डावखरे, तसेच
भाजपाचे सर्व लोकप्रतिनिधी,जिल्हा पदाधिकारी,मोर्चा,आघाडी,प्रको ष्ठ, सेल पदाधिकारी,मंडल अध्यक्ष मंडल पदाधिकारी, कार्यकर्ता यांच्या सहकार्याने ने करण्यात आले आहे
या कार्यक्रमाला भाजपाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेवा पंधरवड्यात आरोग्य तपासणी शिबिरे, स्वच्छता मोहिमा, वृक्षारोपण आदी उपक्रम हाती घेण्यात येणार असून ठाणे भाजपाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीची जाणीव सातत्याने जपली जात असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

