ठाण्यात सह जिल्हा निबंधक कार्यालयातील वरिष्ठ लिपिकासह आणखी एकाला ७० हजार रुपयांच्या लाचप्रकरणी रंगेहात अटकठाणे : ठाणे येथील सह जिल्हा निबंधक वर्ग १ कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाने खासगी इसमामार्फत ७० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सापळा रचत त्या दोघांना रंगेहात पकडले. तक्रारदार यांच्या आईने सन १९८७ मध्ये भाईंदर पश्चिम येथील शांती विहार नगर परिसरात असलेल्या जयलक्ष्मी को-ऑप. हौसिंग सोसायटीमधील गाळा क्रमांक ११ खरेदी केला होता. शासनाच्या अभय योजना २००८ अंतर्गत त्या मालमत्तेचे नियमितीकरण करण्यासाठी मुळ खरेदीखत सह निबंधक कार्यालयात सन २००९ मध्ये जमा करण्यात आले होते.अलीकडे तक्रारदार यांनी ते खरेदीखत परत मिळवण्यासाठी ठाणे येथील सह निबंधक वर्ग १ कार्यालयात संपर्क साधला असता, संबंधित वरिष्ठ लिपिक दिपक इसळ यांच्यामार्फत खासगी इसम अजित कोकमकर यांनी ७० हजार रुपये लाच मागितल्याचे उघड झाले. लाच मागणीची लेखी तक्रार तक्रारदार यांनी २८ ऑक्टोबर रोजी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानुसार, पडताळणीदरम्यान इसळ व कोकमकर यांनी ७० हजारांवरून ६५ हजार रुपयांत तडजोड करून दोन टप्प्यांत रक्कम स्विकारण्याचे मान्य केले होते.त्याअनुषंगाने सापळा रचून करण्यात आलेल्या कारवाईत खासगी इसम अजित कोकमकर यांना लोकसेवक दिपक इसळ यांच्या वतीने तक्रारदारांकडून ३५ हजार रुपयांचा पहिला हप्ता स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणात दिपक इसळ यांनाही अटक करण्यात आली असून, दोघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.